आटपाट देशातल्या अचाट, पण अफाट नसलेल्या गोष्टी!
काळच असा होता की, कुणाविषयी तो किंवा ती प्रामाणिक आहे असं कधी म्हटलं जात नसे. नेहमी त्याचं किंवा तिचं रेप्युटेशन चांगलं आहे असं म्हटलं जाई. तर निवृत्तीचं रेप्युटेशन खूप चांगलं होतं. इथल्या व्यवस्थेत प्रामाणिक असणं म्हणजे काय हे समजावून घेण्याचा त्याचा प्रवास चालूच होता. शेवटचं काही सापडलंय, असं काही त्याला अजून वाटलेलं नव्हतं.......